Last Updated: Thursday, April 19, 2012, 10:13
www.24taas.com, लंडन 
लंडन ऑलिंपिकच्या कांऊंटडाऊनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक सुरु होण्यास १०० दिवस राहिले आहेत. आणि सपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकच्या रंगात रंगू लागला आहे. फक्त १०० दिवसांवर लंडन ड्रीम्स येऊन ठेपलं आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं लंडन ऑलिंपिकचे काऊंटडाऊनं सुरु झालं आहे.
ऑलिंपिक म्हणजे जगभरातील खेळाडूंचा कुभंमेळाच. आता याच महासोहळ्याला केवळ १०० दिवस राहिले आहेत. स्पर्धेसाठी सर्व स्टेडियम्स सज्ज झाले आहेत. जगभरातील खेळाडू - प्लेअर्स या स्पर्धेची आतूरतेनं वाट पाहत आहेत. लंडन ऑलिंपिक समितीही तयारींवर अखेरचा हात फिरवत आहे. संपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकचा रंग चढला आहे.
२७ जुलैला ऑलिंपिंक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आणि १२ ऑगस्टपर्यंत ऑलिंपिकमधील चुरस पाहता येणार आहे. त्यामुळेच १०० दिवसांनी सुरु होत असलेल्या ऑलिंपिकच्या महासोहळ्यासाठी लंडन सज्ज झालं आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 10:13