२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!

Last Updated: Sunday, September 8, 2013, 12:14

२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.

अभय चौटाला 'आयओए'चे नवे अध्यक्ष

Last Updated: Thursday, December 6, 2012, 11:20

अभय चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. रणधीर सिंह यांनी मैदानातून माघार घेतल्यानं चौटाला यांची बिनविरोध निवड झालीय.

'ढिम्मपणाचा आयओएला फटका...'

Last Updated: Thursday, December 6, 2012, 09:40

भारतीय ऑलिंपिक संघटनेवर (आयओए) घातली गेलेली बंदी दुर्दैवी आहे. पण याला ‘आयओए’चं स्वत:च जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओसी) कारवाईमध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असं सांगत केंद्र सरकारनं या प्रकरणात हात झटकलेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 19:05

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केलं आहे. ऑलिंपिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे.

कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 22:38

कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

आणि ते शेवटचे १०० दिवस.....

Last Updated: Thursday, April 19, 2012, 10:13

लंडन ऑलिंपिकच्या कांऊंटडाऊनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक सुरु होण्यास १०० दिवस राहिले आहेत. आणि सपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकच्या रंगात रंगू लागला आहे. फक्त १०० दिवसांवर लंडन ड्रीम्स येऊन ठेपलं आहे.

ऑलिंपिक आणि भारत...

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 14:10

अमर काणे
लंडन ऑलिंपिक आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय...आणि पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय ती भारताला ऑलिंपिकमध्ये किती मेडल्स मिळेल याची...वास्तविक भारत क्रीडापटूंपेक्षाही क्रीडाप्रेमींचा देश ओळखला जातो..लिव्हिंगरुममध्ये बसून टीव्हीवर खेळ बघायचा. एखादी क्रिकेट मॅच वा टेनिस मॅचचा बघायची.

भारतीय संघाचे लंडन ड्रीम साकार

Last Updated: Sunday, February 26, 2012, 22:35

भारतीय हॉकी संघाने फ्रान्सवर ८-१ असा शानदार विजय मिळवत लंडन ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला आहे. संदीप सिंगने पाच गोल करत संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला.

टीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 03:01

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे 'मिशन ऑलिंपिक क्वालिफायर' सुरु झाले आहे.