सायना उप - उपांत्यपूर्व फेरीत पराभूत - Marathi News 24taas.com

सायना उप - उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिला आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला.  .
 
 
सायनाला उप - उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.  चीनच्या चेन झिआवो जिया हिने साईनावर २१-१३, २१-१३ अशी मात केली .क्विंगदावो , चीन येथे ही स्पर्धा सुरू आहे . या स्पर्धेत साईनाला पाचवे , तर जियाला ४०वे मानांकन आहे . या दोन्ही प्रमथम आमनेसामने आल्या होत्या . मात्र , साईनाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही . जियाने तिचे आव्हान ४४ मिनिटांतच परतवून लावले .
 
 
सायनाबरोबर साई प्रणीत , प्रज्ञा गद्रे - प्राजक्ता सावंत , व्ही . दिजू - ज्वाला गुट्टा , अक्षय देवलकर - प्रज्ञा गद्रे यांचेही आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत पदकाची आशा आता मावळली आहे.
 
 
संबंधित बातमी
 
सायना नेहवालची विजयी सलामी

सायना नेहवालची विजयी सलामी
भारताची स्टार सायना नेहवालने आशिया स्पर्धेत पहिल्या लढतीत बाजी मारली आहे. चीनमधील क्विंगडाओत सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत (एबीसी) पाचवी मानांकित सायनाने विजयी सलामी दिली.

First Published: Friday, April 20, 2012, 15:03


comments powered by Disqus