Last Updated: Monday, November 28, 2011, 12:25
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
चौथ्या कॉर्पोरेट कबड्डी स्पर्धेत ONGC टीमनं विजय पटकावून हॅट्ट्रिक साधली. ONGC टीमनं एअर इंडिया टीमला ३२-२१ अशा फरकानं हरवलं. या स्पर्धेमध्ये २६ टीम्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची उपस्थिती होती.
कबड्डीला पुन्हा एकदा राजाश्रय मिळावा या उद्देशानेच या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे कबड्डीला कॉर्पोरेट टच देत.. कबड्डीचा आवाज घुमला. महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धांचे जास्तीत जास्त आयोजन केले जावे यासाठीच राष्ट्रवादीनं या स्पर्धेला उचलून धरलं
तसेच यावेळ शरद पवार यांच्या हस्ते कबड्डी-श्वास ध्यास आणि प्रवास या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच माजी हॉकीपटू धनराज पिल्लेचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकरांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचीही उपस्थिती होती.
First Published: Monday, November 28, 2011, 12:25