२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला! Tokyo to host 2020 Olympic Games

२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!

२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!
www.24taas.com , झी मीडिया, टोकियो

२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.

ऑलिंपिक कमिटीच्या बैठकीत गुप्त मतदानाचा निकाल जाहीर झाला आणि टोकियोनं इस्तंबूलला मागं टाकत बाजी मारली. निकाल जाहीर होताच टोकियोसह संपूर्ण जपानमध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. टोकियोनं ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा दुसऱ्यांदा मान मिळविला आहे. यापूर्वी १९६४ मध्ये टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा झाली होती. याशिवाय जपानच्या सप्पोरो शहरानं १९७२च्या आणि नगानो शहरानं १९९८च्या हिवाळी ऑलिंपिंकचं आयोजन केलं होतं.

यजमानपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे म्हणाले, की या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे. जपानमध्ये भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीनंतर झालेल्या नुकसानीनंतर आम्हाला एक मोठी स्पर्धा आयोजनाची संधी मिळाली आहे.

२०१६च्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याची संधी ब्राझिलच्या रिओ दी जनेरो या शहराला मिळाली आहे. हा निर्णय घेण्यासाठी झालेल्या मतदानात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या टोकियोनं २०२०च्या ऑलिंपिकचं यजमानपद मिळवलं. आयओसीची 125वी वार्षिक सर्वसाधारण बैठक सुरू आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013, 12:14


comments powered by Disqus