फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ US MNT Draws Portugal 2-2 in Group G Play at 2

फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ

फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ
www.24taas.com, झी मीडिया

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.

मॅच संपायला 30 सेकंदाहून कमी वेळ असताना वरेलाने रोनाल्डोच्या क्रॉसवर हेडरने ड्रॅमॅटीक गोल करत अमेरिकेशी बरोबरी साधून दिली. तर ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू काही चाललीच नाही.

मॅचच्या पाचव्याच मिनिटाला पोर्तुगालच्या नानीने गोल करत अमेरिकेवर आघाडी घेतली होती. यानंतर सेकंड हाफमध्ये अमेरिकेचा मिडफिल्डर जर्मैन जोन्सने 64व्या मिनिटाला 25 मीटरवरुन सरप्राईज गोल करत पोर्तुगालशी बरोबरी साधून दिली.

यानंतर क्लिंट डेम्पसेने 81व्या मिनिटाला गोल करत अमेरिकेला 2-1ने आघाडी मिळवून दिली. मात्र, वरेलाने अखेरच्या काही क्षणांमध्ये गोल करत अमेरिकेला बरोबरीत रोखल.

या लढतीत विजय मिळवता न आल्याने पोर्तुगालचं स्पर्धतील आव्हान खडतय बनलय. तर अमेरिकेने नॉक आऊटसाठी आपल स्थान मजबूत केलय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 12:55


comments powered by Disqus