Last Updated: Tuesday, September 10, 2013, 12:13
www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टनवर्षातील अखेरच्या ग्रँड स्लॅम अमेरिकन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या द्वितीय मानांकीत राफेल नदालनं सर्बियाच्या अग्रमानांकीत नोवाक जोकोवीचचा पराभव केला. नदालनं जोकोविचचा ६-२, ३-६,६-४, ६-१ असा चार सेटमध्ये पराभव करत २०१३ च्या US ओपन ट्रॉफिवर आपलं नाव थाटात कोरलंय.
सुमारे तीनतासांपेक्षा जास्तकाळ चाललेल्या फायनलमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या क्षमते पेक्षा खेळून सामन्यात रंगत भरली. पण अखेरीस नदालच्या फायटींग स्पीरिटने त्याला तेरावं ग्रँड स्लॅम मिळून दिलं.
आता नदाल फक्त रॉजर फेडरर (१७) पीड सॅम्प्रास (१४) यांच्या मागे आहे. गेल्या सात सामन्यांतील पाचवा विजय मिळवत नदालने जोकोवीचवरची हुकुमत पुन्हा एकदा सिद्ध केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, September 10, 2013, 07:28