Last Updated: Saturday, November 12, 2011, 11:30
टेनिस आयकॉन रॉजर फेडररने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोचा ६-३, ७-५ असा पराभव करत आपल्या कारकिर्दीतली ८०० वी मॅच जिंकली. आता पारिस मास्टरच्या सेमिफायनलमध्ये फेडरेरचा सामना तोमास बरडाईचशी होईल. टेनिसच्या इतिहासात ८०० सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा फेडरर हा सातवा खेळाडू आहे.