अमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन, US Open final : Serena vs Azarenka

अमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन

अमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

अव्वल सीडेड आणि डिफेंडिंग चॅम्पियन सेरेना विलियम्स आणि वर्ल्ड नंबर टू विक्टोरिया अझारेंका यांच्यामध्ये यंदाची यूएस ओपनची फायनल रंगणार आहे.

सेरेनाने सेमी फायनलमध्ये चीनच्या पाचव्या सीडेड ली ना हिला ६-०, ६-३ नं पराभूत करत फायनल गाठली आहे. तर अझारेंकाने सेमी फायनलमध्ये इटलीच्या फ्लेविया पेन्नेट्टावर ६-४, ६-२ ने पराभूत करत फायलमध्ये धडक मारली. आपल्या करियरमधील १७व्या ग्रँड स्लॅमला गवसणी घालण्यासाठी सेरेना कोर्टवर उतरेल. तर सलग दुसऱ्यांदा अझारेंकाने यूएस ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.



गेल्या वर्षी सेरेना आणि अझारेंकामध्येच यूएस ओपनची फायनर रंगली होती त्यामध्ये सेरेनाने बाजी मारली होती. आता पुन्हा टॉप सीडेड सेरेनाच बाजी मारते का अझारेंका काही इतिहास घडवते याकडे टेनिसप्रेमींच लक्ष लागून राहिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 7, 2013, 19:21


comments powered by Disqus