Last Updated: Sunday, March 10, 2013, 15:59
www.24taas.com, नवी दिल्लीड्रग रॅकेट प्रकरणी संशय असलेला बॉक्सरपटू विजेंदरच्या अडचणीत वाढ झालीय. रामसिंगनंतर आता अनुपसिंग केहलोनबरोबरही विजेंदर एकत्र असल्य़ाच स्पष्ट झालंय.
याचदरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. अटक करण्यात आलेल्या अनुप सिंगनं तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रमुख आरोपींपैकी एक आहे. बादलीनं त्यानं तुरुंगात आपला हात कापण्याचा प्रयच्न तेली पोलिसांना वेळीच याची माहित मिळाली आणि अनुपला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
विजेंदरचं नाव यामध्ये येत असलं तरी त्याला पोलिसांनी अजूनही कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विजेंजरबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, ऑलिम्पिक मेडलिस्टला अजूनही क्लीन चीट मिळालेली नाही. त्यामुळे संशयाच्या भोव-यात असलेल्या विजेंदरच्या अडचणी अजूनही कायम आहेत असच म्हणाव लागणार आहे.
First Published: Sunday, March 10, 2013, 15:58