Last Updated: Monday, April 28, 2014, 12:24
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली पद्मभूषण लिअँडर पेसला पुरस्कार तर मिळाला, पण त्याच्या हृद्यात खूपच दुख: आहे. `२०१२च्या ऑलिम्पिकमध्ये माझ्यासोबत योग्य साथीदार नसल्यानंच भारताला पदक नाही मिळालं, असा खळबळजनक दावा पेसनं दिलेल्या एका मुलाखातीत बोलून दाखवला. यासाठी त्यानं सरळपणे महेश भूपतीला दोषी ठरवलंय`.
२०१२च्या विश्वचषकात बोपन्नानं पेससोबत खेळण्यास नकार दिला, या कारणानं पेसला विष्णूवर्धनसोबत डबल्समध्ये खेळावं लागलं. यासाठी महेश भूपतीच जवाबदार आहे. तसंच "यापुढं मी महेशसोबत खेळणार नाही", असही पेस म्हणाला.
पेस पुढं म्हणाला की, "मी देशासाठी नेहमीच खेळण्यास तयार असतो. येणाऱ्या काळात मी सर्बियाविरुद्ध डेव्हिस चषकात खेळणार आहे. तसंच सहा महिन्यांपूर्वीच ग्रँडस्लॅम जिंकल्यानं, मी दोन वर्षानंतर होणाऱ्या २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास देखील शारिरीकरित्या तयार होत आहे".
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 28, 2014, 12:24