Last Updated: Sunday, September 8, 2013, 22:12
www.24taas.com, झी मीडिया, ब्युनस आयर्स2020 मधील ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. मतदानाच्या आधारावर कुस्तीनं बाजी मारली. स्क्कॉश, बेसबॉल यासारख्या खेळांना चितपट करत कुस्तीनं ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं.
अर्जेन्टीनामध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाच्या बैठकित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीमध्ये आय़आओसीनं कुस्तीला ऑलिम्पिकमधून वगळलं होतं. यानंतर सर्वच स्तरातून कुस्तीच्या समावेशाबाबत प्रयत्न सुरु होते. अखेर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीला स्थान मिळाल्यानं सा-याच भारतीयांना आनंद झाला आहे.
भारताला कुस्तीमध्ये आतापर्यंत चार मेडल्स मिळाले आहेत. खाशाबा जाधव यांना ब्राँझ, सुशील कुमारला सिल्व्हर आणि ब्राँझ तर योगेश्वर दत्तनही ब्राँझ मेडल पटकावलं होतं. कुस्तीच्या समावेश भारतीय कुस्तीपटूंचा आनंद निश्चितच द्विगुणित झाला असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 8, 2013, 22:12