Last Updated: Friday, January 13, 2012, 17:11
www.24taas.com, पुणे पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.
हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच विळ्याभोपळ्याचं सख्य आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत या दोन नेत्यांमध्ये सामना होईल अशी शक्यता होती. मात्र काँग्रेसनं निवड समितीच्या प्रमुखपदी पतंगराव कदम यांची नियुक्ती केली. त्यामुळं नवी चर्चा सुरु झाली. हर्षवर्धन पाटील यांनी माघार घेतली की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे. ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर पतंगरावांची निवड केल्याचं काँग्रेसच्या शहरातल्या नेत्यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीनं मात्र या मुद्द्याला विशेष महत्त्व दिलेलं नाही. आम्हाला काहीच फरक पडत नाही असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेला तोंड देण्यासाठी पतंगरावांना काँग्रेसनं पुढं केलय. मात्र शहरात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची ताकद पहाता पतंगरावांना मेहनत करावी लागणार आहे.
First Published: Friday, January 13, 2012, 17:11