Last Updated: Tuesday, January 17, 2012, 20:40
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड 
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जात प्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. अजित पवारांचे विश्वासू अशी जगदीश शेट्टी यांची ओळख आहे.
जगदीश शेट्टी आणि त्यांचे भाऊ उल्हास शेट्टी या दोघांचंही जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. 2007 च्या महापालिका निवडणुकीत या शेट्टी बंधुंनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. पण आता 2012 च्या निवडणुकीत या दोघांनाही राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे शेट्टी बंधुंचा जात दाखला रद्द करावा, अशी मागणी करण्यात येतं आहे.
First Published: Tuesday, January 17, 2012, 20:40