पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का - Marathi News 24taas.com

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का

www.24taas.com, पुणे
 
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी  यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
 
अजित पवारांचे विश्वासू अशी जगदीश शेट्टी यांची ओळख आहे. सध्या जगदीश शेट्टी आणि त्यांचे भाऊ उल्हास शेट्टी यांना शिवसेनेनं चांगलंच अडचणीत आणलं आहे. या दोघांचंही जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. २००७ च्या महापालिका निवडणुकीत या शेट्टी बंधुंनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. पण आता २०१२ च्या निवडणुकीत या दोघांनाही राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे शेट्टी बंधुंचा जात दाखला रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
 

दुसरीकडे शेट्टी बंधुंनी यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. अजित पवारांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या जगदीश शेट्टींना शिवसेनेनं घेरल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. निवडणुका जशजशा जवळ येतील, तसतसा हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, January 18, 2012, 09:57


comments powered by Disqus