प्रशासनाचा व्यर्थ अर्थसंकल्प...

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 20:21

पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यापूर्वीच सुरु झालीय तो अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा अर्थसंकल्प २,८६२.५४ कोटी रुपयांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प प्रशासनानं सादर केल्यामुळं त्यामध्ये नगरसेवकांची कोणतीही भूमिका नव्हती.

जगदीश शेट्टीच्या निवडीनंतर राष्ट्रवादीत हलचल

Last Updated: Saturday, April 7, 2012, 23:19

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगदीश शेट्टी यांची निवड झालीय. नवनाथ जगताप यांच्या माघारीने ही निवड बिनविरोध झाली. शेट्टी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या गटातले मानले जातात. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध असल्यानं निवडीत चुरस होण्याची शक्यता होती. मात्र जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं शेट्टी यांचा मार्ग सुकर झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 09:57

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.