Last Updated: Friday, January 20, 2012, 12:03
www.24taas.com , नाशिक नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय झालाय. छगन भूजबळांच्या रामटेक या निवासस्थानी पाच तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
काँग्रेस ६४ तर राष्ट्रवादी काँग्रेस ५८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. वॉर्डवाटपाचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर मुंबई महापालिकेसाठी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची घोषणा होऊनही अजून दोन वॉर्ड वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. तसंच ठाण्यातही आघाडीचं जागावाटप झालं असलं तरी वॉर्डवाटप अद्याप शिल्लक आहे.
First Published: Friday, January 20, 2012, 12:03