Last Updated: Thursday, February 9, 2012, 16:26
www.24taas.com, नाशिक पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
संध्याकाळपर्यंत संपूर्ण नाशिक पिंजून काढण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे. मनसेचे सर्वाधिक नगरसेवक नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे राज ठाकरेंच्या रोड शोला नाशिकमध्ये कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल उत्सुकता आहे.
त्यातच नाशिकच्या मनसे उमेदवाराचं कार्यालय जाळण्याची घटना कालच घडली. त्याबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष लागलं आहे. नाशिकमध्ये अजून एकाही बड्या नेत्यानं प्रचाराला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 16:26