राहुल गांधींचा रोड शो, विरोधकांची टीका!

Last Updated: Saturday, May 10, 2014, 14:42

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज राहुल गांधी वाराणसीत भव्य रोड शो केला. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आले आहेत आणि याठिकाणी ते शक्तिप्रदर्शन करतायत. राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.

राहुल गांधी यांचा आज वाराणसीत रोड शो

Last Updated: Saturday, May 10, 2014, 11:10

नरेंद्र मोदींच्या हिट रोड शोनंतर आज राहुल गांधींचा वाराणसी दौरा होतोय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं आपलं सर्वात महत्त्वाचं कार्ड वापरलंय.

आरती शक्य नाही, गंगा माते माफ कर - नरेंद्र मोदी

Last Updated: Thursday, May 8, 2014, 09:43

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वाराणसीत जात आहेत. मात्र, मोदी तिथून बारा किमी दूर असलेल्या जगतपूरमध्ये सभा घेणार आहेत.

गुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो थांबवला

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 17:22

`आप`पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा रोड शो गुजरातमध्ये थांबवण्यात आला आहे.

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

आदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार'

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:45

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच प्रचारसभेत गुंतलेले आहे. मुंबई, पुणे नंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असल्याने तरूणांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे.

राज यांच्या 'रोड शो'ला शिवसैनिकांचा 'राडा'

Last Updated: Thursday, February 9, 2012, 22:29

नाशिकमध्ये मनसे उमेदवाराच्या रोड शो दरम्यान शिवसैनिक समोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी निघालेला रोड शो मेनरोड मार्गे गाडगेमहाराज पुतळ्याजवळ आला असताना हा प्रकार घडला.

राज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'

Last Updated: Thursday, February 9, 2012, 16:26

पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.

पुण्यात राज ठाकरे, अजित पवार यांचा 'रोड शो'

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 12:12

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये रोड शो करणार असल्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांवर आज रोड शोंचा धमाका आहे.