Last Updated: Saturday, February 11, 2012, 11:04
www.24taas.com, नाशिक ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक महापालिका आयुक्त बी.डी.सानप यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी पी.वेलरासू यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
याआधीही सरकारच्या आदेशानुसार सानप यांची आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यावेळी सानप यांनी सरकारला आव्हान दिल्यानं जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्यात कलगीतुरा रंगला होता. मात्र आता निवडणूक कार्यात सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत सानप यांची बदली करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान ही बदली संशयास्पद असून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
First Published: Saturday, February 11, 2012, 11:04