Last Updated: Monday, February 13, 2012, 14:45
www.24taas.com, पुणे पुण्यातल्या प्रचार सभेत नारायण राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला. सर्वात जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीचे आहेत. कलमाडींना नावं ठेवता, तुम्ही पुण्याचे काय नाव उज्ज्वल केले असा सवाल राणेंनी केला.
अजित पवारांनी राज्य बॅंक, कारखाने बुडविले. पुण्याचे पालक म्हणून घेताना लाज वाटत नाही का, अशी जोरदार टीका राणेंनी केली. राणेंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात येऊन दादांचं वस्त्रहरण केलं, अशी चर्चा आता रंगू लागली.
कोकणात नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातच अजितदादा पवारांनी सभा घेऊन उघड आव्हान दिलं होतं. त्याचीच एक प्रकारे सव्याज परतफेड राणेंनी महापालिका प्रचारसभेच्या माध्यमातुन केली आहे असं म्हणावं लागेल.
First Published: Monday, February 13, 2012, 14:45