Last Updated: Saturday, February 22, 2014, 22:59
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी. चार वर्षांच्या एका चिमुकलीवर एकाचवेळी दहा ते बारा कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालीय.
चिंचवडमधल्या एम्पायर इस्टेटमध्ये राहणारी ४ वर्षांची इशिता बॅनर्जी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी अचानक १० ते १२ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला, त्यात ती गंभीर जखमी झालीय. हे मोकाट कुत्रे अक्षरशः तिचा जीवच घेणार होते, पण एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे ती वाचली.
सध्या इशितावर उपचार सुरु आहेत.कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आतापर्यंत शेकडो तक्रारी करुन झाल्या, पण महापालिका चक्क त्या तक्रारींना केराची टोपली दाखवतेय
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, February 22, 2014, 22:59