लोणावळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ३ ठार, सात जखमी3 killed in Accident near lonavala, seven injured

लोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी

लोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी
www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा

लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.

कार एका पिक-अप व्हॅनला धडकून हा अपघात झालाय. कारचा टायर फुटून कार पिकअप व्हॅनला धडकली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लोणावळा इथं सिंहगड कॉलेजसमोर पुणे-मुंबई लेनवर हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं कार बाजूनं चाललेल्या एका एका पिक-अप व्हॅनला धडकली. या धडकेमुळं सदर पिक अप व्हॅन मार्गावरच पलटली. यामुळं पिक-अप व्हॅनमध्ये बसलेल्या तीन महिला ठार झाल्या तर अन्य सात जण जखमी झाले आहेत.

या जखमींमधील तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. सर्व जखमींवर निगडी इथल्या लोकमान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 5, 2013, 13:07


comments powered by Disqus