उमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 10:21

लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 08:47

मुंबईतल्या वरळी परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. फॅबिआ गाडीनं मारुती सुझुकीला दिलेल्या धडकेत चौघं जण गंभीर जखमी झालेत. रात्री १२च्या सुमारास ही घटना घडलीय.

लोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 18:55

लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १५ ठार

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 10:20

पालघर तालुक्यातील मेंढवण गावाजवळ बसला भीषण अपघात झालाय. लक्झरी बस पुलावरुन कोसळून १५ जण ठार झालेत.

मुंबईतील वऱ्हाडाच्या बसला अपघात, २७ ठार

Last Updated: Monday, May 28, 2012, 12:39

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात २३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. खालापूर जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाड असलेल्या दोन मिनी बसना मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.

वसईत भीषण अपघात, ३ ठार

Last Updated: Sunday, May 27, 2012, 12:08

वसईत ट्रक आणि इंडिका कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. वसईच्या सातिवली खिंडीत बाफणा परिसरातून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला.

शिर्डीहून येताना भाविकांचा अपघात, ५ ठार

Last Updated: Sunday, May 13, 2012, 08:57

अहमदनगर जिल्ह्यातल्या मनमाड रोडवर राहुरीजवळ टाटा मॅजिकला झालेल्या अपघातात ड्रायव्हरसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेले पाचही जण भाविक शिर्डीहून शनी शिंगणापूरला निघाले होते.

पुन्हा एकदा भीषण अपघात, ८ ठार

Last Updated: Sunday, April 8, 2012, 15:16

कालचा शनिवार अपघातवार ठरला. मात्र आजही अपघाताची मालिका सुरूच आहे. आजही अपघातात ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जळगावमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.