पुण्यात ३ पिस्तुले, १५ काडतुसे जप्त, 3pistol & 15 Raunds seized by police in pune

पुण्यात ३ पिस्तुले, १५ काडतुसे जप्त

पुण्यात ३ पिस्तुले, १५  काडतुसे जप्त
www.24taas.com झी मीडिया, पुणे

पुण्यामध्ये स्वारगेट पोलिसांनी ३ पिस्तुलं आणि १५ काडतुसं जप्त करण्यात आलेत. संतोष बो़डके या व्यक्तीकडून ही पिस्तुलं पकडण्यात आलीयेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा बोडके यांचा संतोष हा पती आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय.

या प्रकरणी संतोष बोडके याला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. याच प्रकरणात संतोष परदेशी यालाही अटक करण्यात आलीय. परदेशीही सारसबाग परिसरात असताना त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्याला अटक करण्यात आली.

संतोष याची अधिक चौकशी केली असताना त्यांने कबुली दिली. यानंतर तपासादरम्यान संतोष याच्याकडे दोन पिस्तुले सापडली.संतोष बोडके याच्यावर यापूर्वी खून आणि दंगल केल्याप्रकणी दोन गुन्हे दाखल आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

NCP, Round, cartridge, Pune, Police, Manisha Bodake

First Published: Saturday, August 17, 2013, 11:53


comments powered by Disqus