शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या 6 beggars killed in Shirdi

शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या

शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान शिर्डी पोलिसांसमोर आहे.

लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेली शिर्डी नगरीत सध्या दहशतीचं वातावरण आहे. शिर्डीतल्या भिका-यांसाठी जुलै महिना हा काळ ठरतोय. 8 जुलैला शिर्डीतल्या रेल्वे स्थानकावर दोन भिका-यांची दगड घालून हत्या करण्यात आली. तर एकाला जखमी करण्यात आलं. या घटनेचा तपास सुरु असतानाच रविवारी एकाच रात्री तीन भिका-यांची हत्या झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

शिर्डीतल्या या हत्या सत्रामुळे शिर्डी पोलीस चक्रावून गेलेत. या प्रकरणात सीरियल किलरचा हात असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतीय. शिर्डीत साईभक्तांची दिवस-रात्र ये-जा सुरु असते. या भक्तांच्या सुरक्षेला धोका पोहचू नयेयासाठी या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 20:02


comments powered by Disqus