दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले, 7 kg. gold robb in pune

दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले

दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले


www.24taas.com, पुणे

पुण्यातील रास्ता पेठ भागात असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रास्ता पेठ भागातील मुख्य रस्त्यावर नाकोडा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक पाठीमागेच राहतात. गुरुवारी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी दुकान पाठीमागून फोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी साडे सात किलो सोने लांबविले आहे.

दुकानामध्ये सीसीटीव्ही असून, यामध्ये चोरट्यांचे छायाचित्रण झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

First Published: Friday, November 2, 2012, 10:23


comments powered by Disqus