दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले

Last Updated: Friday, November 2, 2012, 10:23

पुण्यातील रास्ता पेठ भागात असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले आहे.

पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, May 11, 2012, 22:57

पुण्यात हडपसरमधील ओंकार ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार करून दरोडा घालण्याचा 2 जणांनी प्रयत्न केला. मात्र दुकानाचे मालक आणि परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळं हा दरोड्याचा प्रयत्न फसला. सुदैवानं गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही.

सराफ व्यापाऱ्यांचा संप मागे

Last Updated: Friday, April 6, 2012, 22:47

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशभरातील सराफ व्यावसायिकांनी पुकारलेला संप२१ दिवसानंतर आज शुक्रवारी मागे घेतला.

अर्थमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, सराफांचा संप सुरूच

Last Updated: Friday, April 6, 2012, 16:01

सोन्यावरच्या आयात आणि सेवा कराच्या निषेधार्थ सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. सराफा व्यापाऱ्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. पण या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे.

सराफा बंदने राज्यातील ग्राहकांची पंचाईत

Last Updated: Saturday, March 17, 2012, 17:37

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.

बजेटविरोधात सराफांचा संप

Last Updated: Saturday, March 17, 2012, 10:12

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.