कराड येथील अपघातात 7 ठार, 5 जण गंभीर, 7 killed in Karad Accident, others 5 critical

कराड येथील अपघातात 7 ठार, 5 जण गंभीर

कराड येथील अपघातात 7 ठार, 5 जण गंभीर
www.24taas.com, झी मीडिया, कराड

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळील पेरले गावाजवळ जीप आणि ट्रकच्या अपघातात 7 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

जीपमधील सर्वजण शिखरापूरहून कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पुणे – बंगलोर महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.

जीपमध्ये एकूण 22 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी पुण्यातील शिकरापूर या गावातले आहेत. देवदर्शनासाठीसाठी ते कोल्हापूर महालक्ष्मी आणि ज्योतिबाला जात होते. दरम्यान हा अपघात झालाय. यातील सर्व जखमींना कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 13, 2014, 14:55


comments powered by Disqus