Last Updated: Sunday, July 14, 2013, 18:06
www.24taas.com, झी मीडिया, पुणे८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद सासवडला मिळालंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ.माधवी वैद्य यांनी पुण्यात आज ही घोषणा केली.
या संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या, तरी वर्षाच्या शेवटी हे संमेलन होण्याची शक्यता आहे. यानिमित्तानं आचार्य अत्र्यांची जन्मभूमी असलेल्या सासवडला पहिल्यांदाच साहित्य संमेलनाचं यजमानपद भूषवण्याचा मान मिळणार आहे. या संमेलनाच्या यजमानपदासाठी सासवडकडून तिसऱ्यांदा निमंत्रण आलं होतं.
या वर्षी सासवडबरोबरच पिंपरी-चिंचवड कडूनही साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं होतं. मात्र यावर्षीचं साहित्य संमेलन सासवडलाच होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 18:06