साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

Last Updated: Sunday, January 5, 2014, 22:52

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

Last Updated: Saturday, January 4, 2014, 08:11

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

`शाळेत गणित जमलं नाही, पण राजकारणात जमतं` - पवार

Last Updated: Friday, January 3, 2014, 21:51

आपल्याला शाळा आणि कॉलेजात गणित कधी जमलं नाही, मात्र राजकारणात मला गणित जमतं, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सासवडच्या साहित्य संमेलनात बोलतांना सांगितलं.

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

Last Updated: Friday, January 3, 2014, 15:19

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:58

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

यंदाचं अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन सासवडमध्‍ये!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 18:06

८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद सासवडला मिळालंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ.माधवी वैद्य यांनी पुण्यात आज ही घोषणा केली.