खंडाळा येथील अपघातात ९ ठार, ५ जखमी, 9 killed in accident at Khandala, 5 injured

खंबाटकी घाटातील अपघातात ९ ठार, ५ जखमी

खंबाटकी घाटातील अपघातात ९ ठार, ५ जखमी
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

बंगलोर हायवेवर साताऱ्याकडून पुण्याकडे जात असलेल्या टेम्पो क्रुझरला अपघात झाला. खंबाटकी घाटात झालेल्या या अपघातात ९ ठार तर ५ जण गंभीर जखमी झालेत.

पुण्याकडे जात असलेला कंटेनर एका वळणावर शेजारून जात असलेल्या टेम्पो क्रुझरवर कलंडला. हा अपघात साताऱ्याकडून पुण्याला जाताना खंडाळ्याजवळील बोगदा पास केल्यानंतर पुढील एस आकाराच्या वळणावर झाला.

या अपघातात पिंटू चव्हाण, समर्थ चव्हाण, मयूर जगदाळे, नितीन डफळे, शंकर पवार, मिथून कांबळे यांचा मृत्यू झाला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 08:21


comments powered by Disqus