शालेय सहलीच्या बसला अपघात, सहा ठार, accident near tuljapur, 7 Dead

शालेय सहलीच्या बसला अपघात, सात ठार

शालेय सहलीच्या बसला अपघात, सात ठार
www.24taas.com, झी मीडिया, तुळजापूर
तुळजापुरात दोन बसच्या धडकेत ७ ठार आणि १६ जण जखमी झाल्याची घटना घडलीय..मृतांमध्ये ६ विद्यार्थी आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे..तुळजापूर-सोलापूर रोडवर ही घटना घडलीय...


नागपूरहून सोलापूरला येणारी ट्रॅव्हल्स बसने सोलापूरहून तुळजापूरला जाणा-या मिनी बसला धडक दिलीय.. कोल्हापुरातल्या करवीर इथल्या सागवडे कुमार विद्यामंदीर शाळेतले विद्यार्थी सहलीसाठी आले होते..

माळुंब्रा गावाजवळ आज सकाळी ८ वाजेच्या सुमारे हा अपघात घडला. अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यामुळे माळुंब्रा येथील गावकऱ्यांनी लगेच घटना स्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ तुळजापूर येथील रुग्णालयात हलविले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 7, 2013, 09:38


comments powered by Disqus