Last Updated: Saturday, August 10, 2013, 06:39
www.24taas.com, झी मीडिया, कर्जतमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक आज झालेल्या अपघातात मुंबईतील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी झाला.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा येथे मारुती कार गाडीला अपघात झाला. वेगात असलेल्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्तादुभाजक तोडून पलिकडून येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकली. यात कारमधील चारजण जागीच ठार झालेत. या अपघातानंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
अपघातात शिरीष केशव विचारे (४७), नरेश शिवराम काटकर (४५), अमितकुमार शर्मा (२५) आणि राजेश रामलू अधेन्की (२४) हे जागीच ठार झाले. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 9, 2013, 13:20