जेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला, acid attack on 4 people in sangli

जेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला

जेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला

www.24taas.com, झी मीडिया, सांगली

सांगलीत चौघांवर अॅसिडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात चारही जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सांगलीच्या सिव्हिल हॉ़स्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सांगलीच्या गुरुप्रसाद ढाब्यावर ही घटना घडली.

200 रुपये जेवणाच्या बिलावरुन हा अॅसिड हल्ला करण्यात आला. अरुण हजारे आणि बबन हजारे हे या ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. यानंतर जेवणाचं झालेलं 200 रुपये त्यांच्याकडे हॉटेल मालकानं मागितलं. पण बबनने जेवणाचे बिल दयायला नकार दिला. हा वाद चांगलाच तापला तेव्हा हॉटेल मालक बाजीराव परिट, त्यांची आई अब्बुबाई परिट आणि त्यांच्या मुलगा संदीप परिट आणि प्रदीप परिट यांच्या अंगावर आरोपींनी अॅसिड फेकलं. अॅसिड हल्ल्यात हे चारही जण गंभीर भाजलेत. तर आरोपी अरुण हजारेही यामध्ये जखमी झालाय.

या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी बबन हजारे आणि अरुण हजारे या दोघांना अटक केली आहे. आरोपी अरुणवरही अजून सांगलीच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. आरोपी बबन बॅटरी रिपेरिंगचं काम करतो आणि त्यानं या कामासाठी वापरल्या जाणार्याअ अॅसिडचा यावेळी वापर केला. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, गंभीर दुखापत करणे, संगनमताने गुन्हा करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 16:16


comments powered by Disqus