पिंपरीचे `बॉस` अजित पवारच! AJit Pawar is the king of Pimpri

पिंपरीचे `बॉस` अजित पवारच!

पिंपरीचे `बॉस` अजित पवारच!
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी

पिंपरी चिंचवड मध्ये होत असलेल्या विविध वादांवर खास शैलीत हल्ला चढवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा आपणच असल्याचं पुन्हा दाखवून दिलय. महापौर पदाच्या बदलावर मला जेंव्हा वाटेल तेंव्हा निर्णय घेईन असं सांगत, पिंपरी चिंचवड मध्ये नाशिक फाटा इथं होत असलेल्या उड्डाणपुलाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी नगरसेवकांना चांगलंच सुनावलं. उड्डाणपुलाला पुलाला स्वर्गीय जे आर डी टाटा याचं नाव देण्याची घोषणाच त्यांनी करून टाकली.

विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अजित पवार शहरामध्ये आले होते. साहजिकच शहरामध्ये असलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं. पुण्यात महापौर बदल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड बाबत तशीच चर्चा सुरु असताना दादांनी त्याला पूर्ण विराम दिला. माझा पक्ष आहे, मला वाटेल तेंव्हा मी महापौर बदल करेल असं सांगत त्यांनी मोहिनी लांडे यांना अघोषित मुदत वाढ दिल्याचं सुचित केलंच पण इच्चुकानाही पिंपरी चिंचवड चे सर्वेसर्वा आपण आहोत ही आठवण करून दिली.



महापौर पदावर स्पष्ट भूमिका घेतलेल्या दादांनी शहरात उड्डाण पुलाच्या नावावरून सुरु असलेल्या वादालाही पूर्ण विराम दिला. एखाद्या रस्त्याला, किंवा वास्तूला व्यक्तीचं नाव दिलं असल तर ते परत दुस-या ठिकाणी देऊ नका असा दमच दादांनी पिम्परीतल्या नगरसेवकांना दिला. नाशिक उड्डाण पुलाला स्वर्गीय जे आर डी टाटा याचं नाव देणार असल्याचं सांगत त्यासाठी रतन टाटा यांची परवानगी घेवू असही दादांनी स्पष्ट केलं.

महापौर पद बदल आणि नाशिक फाटा इथल्या उड्डाण पुलाच्या नावावरून पिंपरीत बरच राजकारण तापलं होत. पण शहरात आलेल्या दादांनी खास शैलीत दोन्ही प्रश्न निकाली काढत शहरावरचा वचक पुन्हा एकदा दाखवून दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 18, 2013, 21:59


comments powered by Disqus