आनंद मोडक यांचे पुण्यात निधन, ANAND MODAK PASSED AWAY

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे पुण्यात निधन


www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. चौकट राजा, एक होता विदूषक, हरिश्चद्रांची फॅक्टरी, असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट त्यातील गाणी आज प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

मोडक मूळचे अकोल्याचे. प्राथमिक शिक्षण त्यांनी गावी घेतले, त्याच ठिकाणी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीताचे पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. घाशिराम कोतवालपासून त्यांनी कामाला सुरूवात केली. सतिश आळेकरांच्या महानिर्वाण या नाटकात त्यांनी प्रथम संगीत दिले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट अशी त्यांची सांगितीक कारकीर्द फुलत गेली. ते महाराष्ट्र बँकेत कामाला होते.

कोथरुडमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

तु तिथे मी, आई, लपंडाव, चौकटराजा, दिशा, २२ जून १८९७,मसाला, , डॅम्बिस, उमंग, समांतर, हरिशचंद्राची फॅक्ट्री, दोहा, दिवसेंदिवस, नातीगोती जिंदगी जिंदाबाद या चित्रपटांना संगीत दिले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 23, 2014, 14:42


comments powered by Disqus