...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी, anna hajare threatened to murder

...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी

...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी
www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.

महत्त्वाचं म्हणजे, अण्णांना ही धमकी एका लेटरपॅडवर लिहिलेल्या चिठ्ठीमधून देण्यात आलीय. यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांचं लेटरपॅड वापरण्यात आलंय.

उस्मानाबादमध्ये अण्णा हजारेंनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यानंतर आज अण्णांना ही धमकी देण्यात आलीय. अण्णांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार केला होता. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार करत अण्णांनी हे पाऊल उचललं होतं.

दरम्यान, खुनासारखा गंभीर आरोप असणारे राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंह पाटील बाहेर कसे? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हे सगळं काँग्रेस आघाडीचे कटकारस्थान आहे, असा आरोप नुकताच उद्धव ठाकरे यांनी पद्मसिंह पाटील यांच्या जामीनाबद्दल बोलताना केला होता.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 16:15


comments powered by Disqus