अण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय , Anna Hazare said Gopal Rai get out

अण्णांच्या खरडपट्टीनंतर गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय

अण्णांच्या खरडपट्टीनंतर  गोपाल राय यांचा आंदोलनातून काढता पाय
www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी

व्ही. के. सिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांची चांगलीच खरडपट्टी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. त्यांना जनलोकपाल आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, अण्णांचे आंदोलन वादाचा आखाडा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी उपोषण करत आंदोलन पुकारले आहे. मात्र, आंदोलनातून मोठे झालेले अरविंद केजरीवाल फिरकले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर दिल्लीत केजरीवाल यांनी जाहीर केले, मी राळेगणसिद्धीला जाणार आहे. तेथे मी लोकांमध्ये बसेन. त्यानंतर केजरीवाल यांना ताप आला. त्यांनी दौरा रद्द केला. त्याचवेळी त्यांचे सहकारी कुमार विश्वास गेले. त्यांना धक्काबुकी करीत त्यांच्या येण्याला आक्षेप घेतला गेला.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची भेट घेतली. त्यानंतर समुदयाला मार्गदर्शन करताना सिंग यांच्या भाषणात अडथळा आणला गेला. सिंग यांनी आम आदमी पक्षाशी संबंधित काही वक्तव्ये केल्यानंतर तेथे उपस्थित असलेले आपचे सदस्य गोपाय राय यांनी आक्षेप घेतला. तुम्ही असे ऊठ-सूट कोणावर आरोप करू शकत नाही, असे राय यांनी सिंग यांना बजावले. त्यानंतर काही वेळ गदारोळ माजला.

आज आज व्ही. के. सिंग यांच्या भाषणादरम्यान गोपाल राय यांनी आक्षेप घेतल्याने गदारोळ झाला. अण्णा हजारे यांनी गोपाल राय यांची खरडपट्टी काढली. येथे राहायचे असेल तर गप्प बसा नाहीतर निघून जा. एखाद्या व्यक्तींचे भाषण सुरु असताना मध्येच बोलणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या मर्जीने आंदोलनात सहभागी झाला आहात. तुम्हाला हे सहन होत नसेल येथून चालते व्हावे, असे बजावले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 15:16


comments powered by Disqus