Last Updated: Friday, October 19, 2012, 17:56
www.24taas.com, सांगलीसांगली जिल्ह्यातील विटा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वारंवार लग्नासाठी तगादा लावणार्या प्रेयसीवर प्रियकराने आपल्या तीन मित्रांसह सामूहीक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला आहे. आरोपी लक्ष्मण संदीपान सरगर (वय- 20) याच्यासह त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुमिता उर्फ छकुली सुदाम चव्हाण (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. अनुमिता ही विटा येथील एका कापड दुकानात कामास होती.
तिच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरा विवाह केला होता. तेव्हापासून ती नेहमी निराश असायची. याचा फायदा घेत आरोपी लक्ष्मण याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.
First Published: Friday, October 19, 2012, 17:25