biker vinil kharge - pune to tamilnadu in 36 hours

विनीलची धूम; अवघ्या ३६ तासांत 'पुणे ते तामिळनाडू'

विनीलची धूम; अवघ्या ३६ तासांत 'पुणे ते तामिळनाडू'
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
तुफान वेगाशी सामना करत विनील खारगे या बाईकरनं फक्त ३६ तासांत पुणे ते तामिळनाडू असा तब्बल चोवीसशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. त्याच्या या विक्रमाची नोंद अमेरिकेच्या ‘आर्यन बट या बायकिंग असोसिएशन’नं घेतलीय.

विनील खारगे... बाईक्स आणि वेगाची जबरदस्त क्रेझ आणि बाईकवरुनच काहीतरी अफाट, काहीतरी भन्नाट करुन दाखवण्याची जबरदस्त उर्मी... एका मोटरबाईक स्पर्धेत विनीलनं कौतुकास्पद कामृगिरी केलीय. १६ मार्च २०१२ ला विनिलनं या मोहिमेला चिंचवडमधून सुरुवात केली... आणि तो पोहोचला थेट तामिळनाडूमधल्या मदुराईला... ताशी १२० किलोमीटरच्या वेगानं त्यानं फक्त ३६ तासांत तब्बल २४०० किलोमीटरचं अंतर पार केलं.

ही स्पर्धा महामार्गावरूनच पूर्ण करण्याची अट होती. त्यासाठी विनीलनं पुणे-बंगळुरु या महामार्गाची निवड केली. विनीलनं या कामगिरीचे सगळे पुरावे अमेरिकेच्या ‘आर्यन बट बायकिंग असोसिएशन’ला पाठवले. त्यानंतर आर्यन बट बायकिंग असोसिएशननं विनीलला प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव केलाय.

आता विनीलचं पुढचं लक्ष्य आहे २४ तासांत २४०० किलोमीटर पूर्ण करत ‘बन बर बोल्ड’ स्पर्धा जिंकण्याचं… यासाठी त्याला सगळेच म्हणतायत... ‘बेस्ट ऑफ लक विनील’

First Published: Tuesday, October 9, 2012, 13:00


comments powered by Disqus