Last Updated: Monday, October 14, 2013, 08:01
www.24taas.com, झी मीडिया, सांगलीसांगलीमध्ये शोभेच्या दारूचे काम सुरु असताना स्फोट होवून एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जखमी मध्ये तीन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे.
कवटेएकंद गावात मध्ये ही दुर्घटना घडली. जखमीना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयादशमीनिमित्त रात्रीची आतिषबाजी करण्याची कवठेएकंदमध्ये साडे तीनशे वर्षाची परंपरा आहे.
शिवकाशी प्रमाणे कवठेएकंद गावातही शोभेची दारू तयार केली जाते. मात्र दस-याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने, परिसरात शोककळा पसरली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 08:01