अबब! भावाला दिला २११ फूट लांब बुके!

अबब! भावाला दिला २११ फूट लांब बुके!

अबब! भावाला दिला २११ फूट लांब बुके!
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर

आजपर्यंत लग्न समारंभात अनेक भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, अहमदनगरमध्ये एका भावाने आपल्या भावाला दिलेली लग्नाची भेट अमूल्यच आहे. दीपक हरके याने आपल्या भावाच्या लग्नात तब्बल २११ फूट लांबीचा बुके भेट केलाय. विशेष या बुकेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली आहे. या बुकेबरोबर ‘मुलगी बचाव’चा संदेशदेखील देण्यात आलाय.

आजपर्यंत जगातील सर्वात मोठा बुके म्हणजे १९८ फुटांचा बुके कँनडामध्ये तयार करण्यात आला होता. २००३ साली या बुकेची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली होती. दीपक हारके या तरुणाच्या भावाचं लग्न होतं. या लग्नात त्याने आपल्या भावाला एक अनोखी भेट दिली. जगातील सर्वात मोठा म्हणजे तब्बल २११ फूट लांबीचा बुके दीपक आपला भाऊ अनिकेत याला लग्नात भेट दिला. ‘बेटी बचाव’ अभियान सध्या सर्वत्र राबवले जात आहे. त्याच उद्देशाने हा विश्वविक्रम करण्यात आला आहे.
अबब! भावाला दिला २११ फूट लांब बुके!

२११ फुटांचा हा बुके अहमदनगरच्या नितीन भूतारे याने बनवलाय. या बुकेसाठी २००० विविध फुलांचा वापर करण्यात आला. एव्हढंच नाही तर काही इम्पोर्टेड आणि जरबेराची फुलंदेखील या बुकेसाठी वापरण्यात आली. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून प्रशस्तिपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं.

दीपकने दिलेली अनोखी भेट अनिकेतच्या आयुष्यभर स्मरणात राहील. असे असले तरी या विक्रमी बुकेमुळे का होईना अहमदनगरचं नाव विक्रमांच्या यादीत कोरलं गेलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 28, 2013, 12:44


comments powered by Disqus