पहिल्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी प्रसुती bride is pregnant after marriage second day

पहिल्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी प्रसुती

पहिल्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी प्रसुती
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात लग्न झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी नवरदेवासह नवरी देव दर्शनासाठी जात होती, यावेळी सांगोल्याजवळ प्रसूत झाल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही घटना आहे.

हा विवाह २३ एप्रिल रोजी थाटामाटात पार पडला. लग्नानंतर देवदेव करण्यासाठी २५ एप्रिल रोजी नवरदेवाच्या घरातील मंडळी निघाली. कोल्हापूरच्या ज्योतिबाला जाण्याचा

बेत करून जीप निघाली. सांगोल्याजवळ आल्यावर नवरीच्या पोटात वेदना होऊ लागल्या.

लग्नात गडबडीच्या खाण्यामुळे पोट बिघडले असेल म्हणून तिला सांगोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणि डॉक्टरांना धक्का बसला, कारण डॉक्टरांनी तिला प्रसूतीवेदना सुरू असल्याचे सांगितले आणि थोड्याच वेळात ती प्रसूत झाली. ही वार्ता ऐकून नवरदेव संतापला. त्याने

सासू-सासर्‍याला सांगोल्यास बोलावून घेतले. केसाने गळा कापला म्हणून जाब विचारला.

ग्रामस्थ, तंटामुक्तीचे सदस्य हजर झाले. या वेगळ्याच प्रकाराने सर्व जण अचंबित झाले. जमलेल्या मंडळींना याहून मोठा धक्कानंतर बसला. नवरदेवाने बाळाचा खरा बाप

कोण असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सर्व मंडळींनी डॉक्टरासमक्ष नवरीची हजेरी घेतली. भावकीतील टारगट तरुणाने हा प्रकार केल्याचे तिने बिंग फोडले. यामुळे पंचमंडळींची दातखीळ बसण्याची वेळ आली.

नवरदेवाने राणीला तिच्या आई-वडिलाच्या स्वाधीन करून घरचा रस्ता धरला. लग्नात नवरीच्या हालचालीवरून ही गोष्ट कशी कळली नाही. नवरीच्या आई-बापांनी ही बाब

गुप्त का ठेवली, अशी वेगवेगळी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या घटनेने नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 17:04


comments powered by Disqus