Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:37
www.24taas.com, झी मीडिया, खेडरत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.
इमारतीच्या ढिगा-यात अडकलेल्या 6 जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आलंय. 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर ढिगा-याखाली ३ जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येतेय. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
य़ा इमारतीचं बांधकाम करणारा बिल्डर फरार आहे. या इमारतीचे दोन मजले बांधून तयार होते. मात्र तिस-या मजल्याचं बांधकाम सुरू असतानाच तिस-या आणि दुस-या मजल्याचा स्लॅब कोसळ्यानं ही इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी खाली आली. मन्सूर नाडकर हा बांधकाम व्यवसायिक या इमारतीचं बांधकाम करत होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 20:50