खाजगी बस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार, BUS-CAR-CONTAINER-TEMPO ACCIDENT IN SATARA, 10 DEA

बस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार

बस - कार - कंटेनर - टेम्पोला अपघात, १० ठार
24taas.com, झी मीडिया, सातारा

सातारा - पुणे रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. एका गाडीला झालेल्या अपघातामुळे मागच्या गाड्यांनीह एकमेकांना धडक दिली आणि अपघातात तब्बल १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर ३६ हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन पुरूष आणि सात महिलांचा समावेश आहे.


कसा झाला हा विचित्र अपघात...
सातारा-पुणे पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाजवळचा बोगदा ओलांडून एस आकाराच्या वळणावर सुरुवातीला ट्रॅव्हल्स बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला. त्यामुळे ही बस पलटी होऊन २५-३० फूट खड्ड्यात गेली... पाठीमागून आलेली वॅगनआर गाडी अपघातामुळे रस्त्यावर अचानक थांबली होती.... त्यामुळं पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने या कारला उडवलं... आणि शेजारुन जाणाऱ्या टेम्पोलाही धडक दिली... यामुळे कंटेनरही पलटी झाला.... या विचित्र अपघातात एक पिक-अप व्हॅनही अपघातग्रस्त झाली.

या अपघातात १० जणांचा मृत्यू झालाय. ललितभाई वाघेला, जयाबेन विराणी, वारंग जंगभाई, दिवाडीबेन, कांतीराम वाघेला, नानूबेन जेठवा, चमनबेन जयाभाई पारनेसा, दिवाणी जेठालाल चामडिया, अशी मृतांची नावं आहेत. जखमींना शिरवळमधल्या जोगळेकर हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल आणि खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमधले यात्रेकरु प्रामुख्यानं पोरबंदरमधले आहेत. पोरबंदरमधली यात्रा कंपनी २५ दिवसांची  तीर्थयात्रा करुन परतीच्या मार्गावर होती.

काही दिवसांपूर्वी याच वळणावर अशाच अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं या रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 12:22


comments powered by Disqus