काँग्रेस सरकारला छगन भुजबळांचा घरचा आहेर, Chhagan Bhujbal warning given to Congress gov.

काँग्रेस सरकारला छगन भुजबळांचा घरचा आहेर

 काँग्रेस सरकारला छगन भुजबळांचा घरचा आहेर
www.24taas.com,कोल्हापूर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांना आपले शत्रू मानतात पण आपल्यासमोर खरे शत्रू शिवसेना-भाजप आणि मनसे आहे हे विसरुन चालणार नाही, नाहीतर विपरीत घडेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.

कोल्हापुरात पन्हाळा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकपूर्व तयारी शिबीरात भुजबळ बोलत होते. दरम्यान दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरुन त्यांना सरकारला घरचा आहेर दिला.


दुष्काळासाठी दिलेला पैसा दुष्काळग्रस्तांसाठीच खर्च होतोय का हे तुम्ही-आम्ही तपासून पहायला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

तसेच ख-या कार्यकर्त्यांचा आदर केला पाहिजे, खोट्या कार्यकर्त्यांना दूर ठेवलं पाहिजे, असं आवाहनही भुजबळांनी शिबीरात मार्गदर्शन करताना केलं.

First Published: Sunday, February 3, 2013, 19:24


comments powered by Disqus