Last Updated: Monday, June 17, 2013, 15:37
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.
मुख्यमंत्र्यांनी पहिलीच्या मुलांना बोटाला धरुन वर्गातही पोहचवले. यावेळी यशवंतराव चव्हाण शाळा फुगे तसंच फुलांनी सजवण्यात आली होती. शाळांमध्ये पहिल्यांदाच येणा-या विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी, सरकारनं `चला शाळेला` ही शाळा प्रवेशोत्सवाची मोहिम आखलीये.
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत वाजत-गाजत, गुलाबाचं फूल देऊन तर काही शाळांत मिष्ठान्नाचा बेत आखण्यात आलाय. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर आजपासून शाळा सुरु झाल्यात... स्कूल चलें हम म्हणत बच्चेकंपनी पहिल्या दिवशी शाळेत हजर झालीय...पहिल्या दिवसाचा उत्साह चिमुकल्यांच्या चेह-यावर दिसत होता... तर काहींना सुट्ट्या संपू नये असं वाटत असल्यानं रडूही कोसळलं.. त्यामुळं या सगळ्या गडबडीत दररोज कामावर जाणा-या पालकांचीही धांदल उडाली.
दुसरीकडे पुण्यात शाळकरी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुखद धक्का दिला...मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. नाशिकमध्येही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला..
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 15:24