Last Updated: Sunday, May 19, 2013, 16:28
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे यांनी व्यापा-यांविरोधात आंदोलन करु नये असा फतवा काढलाय.
अनिल शिदोरे यांनी शहर अध्यक्ष बाळा शेडगे यांना SMS करून एलबीटीसंदर्भात राज ठाकरेंच्या आदेशाची वाट पहात असून तोपर्यंत कोणीही आंदोलन करू नये असा सल्ला दिलाय. एवढच नाही तर शिदोरेंना विचारल्याशिवाय कोणीही पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांकडे देऊ नये असा फतवाच जारी केलाय. त्यामुळे राज ठाकरेंचे आदेश मानायचे की शिदोरेंचे असा संभ्रम मनसेत निर्माण झालाय. यामुळे कार्यकर्त्यांत धुसफुसीची चर्चा सुरु झालीय. प्रत्येक पक्षात अशी धुसफूस होत असतेच, मात्र यानिमित्तानं पुण्यनगरीत मनसेत सर्व काही आलबेल नसल्याचं उघड झालं आहे. यामुळं पुण्यात राष्ट्रवादीला मनसे रोखणार तरी कशी, असा सवालही उपस्थित झालाय.
रमेश वांजळे यांच्या निधनानंतर, निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसेने घेतला खरा.. पण ती झाकली मूठ सव्वा लाखाची की कसली, हे उघड झालेले नाही.. आता या पेशवाईची दखल घेतली जाते काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 16:28