Last Updated: Friday, December 20, 2013, 09:22
www.24taas.com, झी मीडिया, पुणेडॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन चार महिने उलटले तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यास पोलिसांना यश आलेलं नाही. दाभोळकरांच्या हत्येला चार महिने पूर्ण होत असताना, या विषयावर बोलायचे सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले आहे.
आतापर्यंत पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ या विषयावर बोलत नव्हते. मात्र या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी असलेले अधिकारीही आता माध्यमांना टाळू लागलेत.. या गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवत बोलायचे टाळले आहे. तर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजेंद्र बनसोडे आणि अपर पोलिस आयुक्त शहाजी सोळून्खे हे देखील बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी हे अधिकारी माध्यमांपासून चक्क पळ काढत असल्याचे चित्र आहे.
तर योग्य वेळी सर्व माहिती सांगण्यात येईल पण अजून ती योग्य वेळ आलेली नाही असं स्पष्टीकरण राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलीये.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 20, 2013, 09:20